देवरे विद्यालयात हिंदी दिनानिमित्ताने हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित करणारे विविध कार्यक्रमांचे आयोजन
भाषणांद्वारे हिंदी दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांच्याहस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून सरस्वती वंदना विद्यार्थ्यांनी सादर केली. हिंदी भाषेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारा प्रभाव नववीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नाट्यछटेतून प्रभावीपणे आपल्या भूमिकेतून व्यक्त केला. कार्तिका साळुंके, तेजस्विनी पाटील, जिया पाटील, वैष्णवी लोहार, सारिका मराठे, सोनाक्षी बिरारे, दुर्वा साळुंखे, प्रणिता मराठे, लावण्या व मोहिनी पाटील यांनी नाटिका सादर करून हिंदी भाषेचा गौरव करणारा कार्यक्रमाचे सादरीकरण केले. हिंदी दिनाचे महत्त्व, पार्श्वभूमी डॉ.आर.आर. बागुल यांनी व ‘आज आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेचे महत्व’ याविषयी हिंदी शिक्षिका ए.एस. बेडसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुषा पाटील व गुंजन पाटील हिने आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक सी.व्ही. नांद्रे, डी.बी. भारती, एम.डी. नेरकर, एम.एस. मराठे तसेच जे.एस. पाटील, डी.बी.पाटील,एस.जी. पाटील, एच. एम.खैरनार यांनी संयोजन केले.

