वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शैक्षणिक सहल संपन्न

नंदुरबार:-शहादा येथील वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शैक्षणिक सहल 19 नोव्हेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी डी डी राजपूत, शिक्षण विस्तार अधिकारी ममता पाटील, वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जे एम पाटील, उपप्राचार्य गणेश सोनवणे, एस बी पवार, उपमुख्याध्यापक पवार जे बी, पर्यवेक्षक खान ए ए, खेडकर ए डी या मान्यवरांच्या हस्ते सहल रवाना करण्यात आली.
वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शैक्षणिक सहल संपन्न
Educational Tour of Vasantrao Naik Madhyamik and Uchha Madhyamik Vidyalaya Concludes

शैक्षणिक सहली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस घेऊन पूर्ण करण्यात आले. सहलीत शहादा महड, पाली, काशीद बीच, मुरुड जंजिरा, रायगड किल्ला, प्रति बालाजी,  जेजुरी, मोरगाव, शिर्डी व शहादा अशी एकूण पाच रात्री व चार दिवस सहल काढण्यात आली. सहलीचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सभामंडप परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. साधारण एक एकरचा परिसर हा स्वच्छ करण्यात आला ज्यात नारळाची दोरी, विटा, पाणी बॉटल, व इतर अविघटकनाशक कचरा मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साफ करण्यात आला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सहल यशस्वीतेसाठी तांबोळी डी डी, शेवाळे एन एल,सूर्यवंशी एम टी, गिरासे जी एल, खेडकर बी वव्ही, कापसे, आर डी, पवार जे बी, वळवी ए एम, राठोड वाय एस, भावसार एस डी, भावसार एल आय, पवार एच एस श्रीमती कलाल आर जे श्रीमती वारुळे एन आर, यांना शिक्षकांनी परिश्रम घेतले. सहलीत इयत्ता पाचवी ते दहावीचे एकूण 51 विद्यार्थी तर अकरावी बारावी कला व विज्ञान शाखेचे एकूण 78 विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: