
समारंभास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प.पू. जुनापीठाधिश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी, राम जन्मभूमी मंदिर न्यासाचे स्वामी गोविंददेव गिरीजी, पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल, स्वामी अखिलेश्वरानंदजी, स्वामी हरिचेतनानंदजी, स्वामी ललितानंद गिरीजी, महंत देवानंदसरस्वती, विनय रोहिला, प्रदीप बत्रा आदी उपस्थित होते.
श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक म्हणून कार्य केले. म्हणूनच आज नव्या पिढीसमोर भारतीय संस्कृतीची महानता टिकून आहे. त्यांच्या समाधी मंदिरामुळे भावी पिढ्यांसाठी एक प्रेरणास्थळ निर्माण झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
भारतीय संस्कृतीने विविधता आत्मसात करून, तिच्या वैभवात भर घातली आहे. ही संस्कृती टिकवण्यात स्वामी सत्यमित्रानंदजी यांच्यासारख्या वाहकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वामीजींनी आपल्या आचरण, कार्यातून या संस्कृतीचे पोषण केले. ती भावी पिढ्यांकडे सुपूर्द केली, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.















