Home महाराष्ट्र अपर आयुक्त आदिवासी विकास, ठाणे अंतर्गत सहा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये शैक्षणिक...

अपर आयुक्त आदिवासी विकास, ठाणे अंतर्गत सहा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी अपर आयुक्त आदिवासी विकास

0
Additional Commissioner Tribal Development for the academic year 2026-2027 in six Ekalavya Model Residential Schools under Additional Commissioner Tribal Development, Thane

ठाणे विभागांतर्गत असलेल्या सहा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमधील ५८३ रिक्त जागांसाठी १ मार्च, २०२६ रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा होणार असल्याचे आदिवासी विकास कार्यालय, ठाणे येथील अपर आयुक्त गोपीचंद कदम यांनी कळविले आहे.

सहा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी इयत्ता सहावीच्या ३६० जागा (१८० मुले व १८० मुली) विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. तर इयत्ता सातवी ते नववीच्या २२३ रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व पूर्वपरीक्षेद्वारेप्रवेश मिळणार आहे.

सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये इयत्ता सहावीसाठी ३० मुले व ३० मुली अशी एकूण ६० प्रवेश क्षमता असणार आहे. तर इयत्ता सातवी, आठवी व नववीसाठी रिक्त जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे. या सर्व जागांवर पूर्वपरीक्षेद्वारे पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. शाळानिहाय रिक्त जागांचा तपशील :- कांबळगाव ७०, शेंडेगाव ७७, सवणे ८०, पळसुंडे (जव्हार) : १२७, हिरवे (मोखाडा) १४७, चळणी (डहाणू) ८२ अशा एकूण ५८३ जागा रिक्त आहेत, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.