
उद्योग चर्चासत्र यशवंतराव चव्हाण अकादमी ऑफ डेव्हलपमेंट अॅडमिनिस्ट्रेशन (यशदा) येथे नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाला केंद्राच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या देबाश्री मुखर्जी, अपर मुख्य सचिव कौशल्य विकास विभाग मनीषा वर्मा या उपस्थित होत्या. यावेळी आयटीआय औंध, पुणे, फ्रोनियस इंडिया प्रा. लि., भोसरी तसेच लाइटहाऊस, निगडी येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यालयीन भेटी देण्यात आल्या.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचा संचालक माधवी सरदेशमुख यांनी पीएम-सेतू योजनेवर सादरीकरण केले. चर्चासत्रात कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव निरंजन कुमार सुधांशू, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त डॉ. अमित सैनी, आरडीएसडीईचे संचालक एस. मूर्ती. चेगोंडी, नवी दिल्लीचे उपसंचालक दिव्यांशू तसेच विविध उद्योगांतील सदस्य उपस्थित होते. चर्चासत्रात ऑटोमोटिव्ह, बांधकाम, वस्त्रोद्योग, एफएमसीजी, इलेक्ट्रॉनिक्स, तेल व वायू तसेच नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांतील सुमारे ३६ पात्र कंपन्यांनी सहभाग घेतला.















