Home नंदुरबार जिल्हा नवीन नूतनीकरण केलेल्या उपविभागीय अधिकारी (SDM) कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले....

नवीन नूतनीकरण केलेल्या उपविभागीय अधिकारी (SDM) कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. सदर उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

0
The inauguration of the newly renovated Sub-Divisional Officer (SDM) office was held with great enthusiasm. The inauguration was conducted by Hon. District Collector Dr. Mittali Sethi.

या प्रसंगी मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा, मा. उपविभागीय अधिकारी श्री. अनय नवंदर तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेले हे नूतनीकरण केलेले कार्यालय प्रशासकीय कार्यपद्धती अधिक गतिमान, सुलभ व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नवीन कार्यालयामुळे नागरिकांना सेवा अधिक जलद व कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध होणार असून प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

#AdministrativeReforms#GoodGovernance#collectorofficenandurbar