
वर्धा : गेल्या अनेक वर्षापासून सिंदी रेल्वे येथील मौजा परसोडी शिवारात वन विभागाच्या सर्वे नंबर 26, 27 व 28 वरील 3 हेक्टर जमिनीवर 82 कुटूंबांनी अतिक्रमण करुन कच्चे व पक्के घराचे बांधकाम केले होते. आज वन विभागाने पोलिस विभागाच्या मदतीने कायदेशिर कार्यवाही करुन 82 घराचे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया शांततेत पूर्ण केली.
आज सकाळी 7 वाजता पासून सहाय्यक वनसंरक्षक हरीलाल सरोदे व माधव आडे यांच्या मार्गदर्शनात 130 वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी तसेच अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या नेतृत्वात पोलिस विभागाच्या 300 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात कार्यवारी करण्यात आली. कार्यवाही दरम्यान कुठलीही अनुचित घटना न घडता शांततेत कार्यवाही पार पडली. सेलूच्या तहसिलदार शंकुतला पाराजे, सिंदीचे नायब राजेंद्र मंथनवार तहसिलदार यांची उपस्थिती होती.















