विनोद हा समाजामध्ये माणूस जोडणारा पूल आहे. त्यामुळे संकटातही जो विनोद शोधतो, तोच खरा मराठी माणूस आहे, अशा शब्दात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाचा गौरव केला.
उपलब्ध साधनांचा पुरेपूर उपयोग करून मराठीची समृद्धी वाढविली पाहिजे. विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून जगभरात विविध देशांमध्ये कार्यरत असलेले मराठी बांधव आपण एकत्र आणण्याचे काम केले आहे. अशा या समृद्ध मराठीचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया, असे आवाहनही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
















