
पदभरती ची प्रक्रिया गतीने सुरू असून पुढील अधिवेशनापर्यंत मोठ्या प्रमाणात भरती प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
विधानपरिषदप्रश्नोत्तरे
नागपूर येथील मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड इम्पोर्ट (मिहान) प्रकल्प हा राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एसईझेड आणि नॉन-एसईझेड क्षेत्रांचा समावेश असलेल्या या प्रकल्पात आतापर्यंत १२० कंपन्यांनी गुंतवणूक केली असून त्यापैकी ९० कंपन्यांचे काम प्रत्यक्ष सुरू आहे. या प्रकल्पामुळे आतापर्यंत १,२७,२२५ रोजगारांची निर्मिती झाली असल्याची माहिती मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
विधानपरिषदप्रश्नोत्तरे
राज्यातील २७१ परिवहन डेपो सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत चांगल्या उत्पन्नक्षम डेपोसोबत दोन ग्रामीण किंवा तालुकास्तरावरील डेपो अशा तीन डेपोचे एक पॅकेज तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
विधानपरिषदप्रश्नोत्तरे
पुणे शहरात विनापरवाना व डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गुंगीकारक औषधे नशा करण्यासाठी तसेच बेकायदेशीर खरेदी-विक्रीच्या उद्देशाने औषधांचा साठा बाळगल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/192891/















