Home नंदुरबार जिल्हा जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

0
By-elections announced for vacant seats of 67 Gram Panchayats in the district

(नंदुरबार) जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमधील सदस्य आणि थेट सरपंच पदाच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 67 ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) प्रमोद भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायतींमधील सदस्य आणि सरपंच यांची पदे रिक्त झाली होती. या रिक्त जागा भरण्यासाठी आता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे.

निवडणूक कार्यक्रम:

• सोमवार 30 मार्च 2026 रोजी तहसीलदारांकडून निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे,

• मंगळवार 7 एप्रिल ते सोमवार 13 एप्रिल 2026 सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) सादर करणे, (शनिवार व रविवार वगळून).

• बुधवार 15 एप्रिल 2026 सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्रांची छाननी,

• शुक्रवार 17 एप्रिल 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस, दुपारी 3 नंतर निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करणे,

• मंगळवार 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान

• बुधवार दिनांक 29 एप्रिल, 2026 रोजी मतमोजणी आणि निकाल

• बुधवार 6 मे, 2026 रोजी निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.