माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा, क्रीडा महोत्सव समितीने सहभागी होण्याचे केले आवाहन

नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा निर्मितीचे शिल्पकार महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचा 15 ऑगस्ट 2026 रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार, 14 ऑगस्ट 2026 रोजी विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले […]
माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा, क्रीडा महोत्सव समितीने सहभागी होण्याचे केले आवाहन
The Sports Festival Committee has appealed for participation in a grand marathon competition organized to mark the birthday of former minister and MLA Dr. Vijaykumar Gavit.

नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा निर्मितीचे शिल्पकार महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचा 15 ऑगस्ट 2026 रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार, 14 ऑगस्ट 2026 रोजी विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर ईश्वर धामणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वाढदिवसानिमित्त क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सिनीयर गट पुरुष 21 कि.मी. व सिनीयर गट महिला 10 कि.मी. मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन 14 ऑगस्ट 2026 शुक्रवार रोजी सकाळी 7 वाजता आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवास स्थानापासुन करण्यात आले आहे. तरी सर्व शाळा व महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनी या स्पर्धेत आपल्या जुनियर कॉलेज व महाविद्यालयातील पुरुष व महिला खेळाडूंना मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करुन विजय गौरव क्रीडा महोत्सव आयोजन समितीस सहकार्य करावे तसेच आपल्या जुनियज कॉलेज व महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकास खेळाडूंसोबत पाठवावे. या स्पर्धेचा मार्ग माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवास स्थानापासून यशवंत विद्यालय – जी.टी.पाटील महाविद्यालय रोड – आंधारे चौक – राणा प्रताप पुतळा बस स्टॅण्ड नेहरु पुतळा गांधी पुतळा उड्डाण पुल गिरीविहार गेट स्वागत पेट्रोलपंप – करण चौफुली – पातोंडा गाव, सप्तश्रृंगी मंदिरापर्यंत परत त्याच मार्गे डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवास स्थानापर्यंत. असा मॅरेथॉनचा मार्ग राहणार आहे. यात विजयी होणाऱ्या प्रथम पाच क्रमांकांना रोख पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रशस्ती प्रमाण पत्र प्रदान करण्यात येईल. त्याचे स्वरूप याप्रमाणे- 11 वी ते सिनीयर पुरुष गट (21 किमी)- प्रथम 11000 रुपये, व्दितीय 7100 रुपये, तृतीय 5100 रुपये, चतुर्थ 3100 रुपये तर पाचशे 2100 रुपये. त्याचप्रमाणे 11 वी ते सिनीयर महिला गट (10 किमी)- प्रथम 11000 रुपये, व्दितीय 7100 रुपये, तृतीय 5100 रुपये, चतुर्थ 3100 रुपये तर पाचशे 2100 रुपये. याप्रमाणे पारितोषिक रक्कम दिली जाणार आहे. सदर मॅरेथॉन स्पर्धा धुळे जिल्हा व नंदुरबार जिल्हा मर्यादित असून सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना आधार कार्ड अनिवार्य असेल. पारितोषिक वितरण समारंभ 15 ऑगस्ट 2026 दुपारी 12 वाजता डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवास स्थानावर होईल.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: