नंदुरबार शहर पोलिस ठाणेची कारवाई,गोवंशीय मांस विक्रीचा पर्दाफाश,40 किलो मांसासह शस्त्रे व वजनकाटा जप्त

नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी नंदुरबार शहर पोलिसांकडून सातत्याने प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. 10 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत नंदुरबार शहरातील बागवान गल्ली परिसरात गोवंशीय जनावराचे मांस विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने […]
नंदुरबार शहर पोलिस ठाणेची कारवाई,गोवंशीय मांस विक्रीचा पर्दाफाश,40 किलो मांसासह शस्त्रे व वजनकाटा जप्त
Action by Nandurbar City Police Station: Sale of bovine meat exposed; 40 kg of meat, weapons, and a weighing scale seized.

नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी नंदुरबार शहर पोलिसांकडून सातत्याने प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. 10 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत नंदुरबार शहरातील बागवान गल्ली परिसरात गोवंशीय जनावराचे मांस विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने बागवान गल्ली परिसरातील शाळा क्रमांक 9 च्या मागील टेकडीवरील एका खोलीवर सकाळी सुमारे 10.05 वाजता छापा टाकला. यावेळी तेथे एक इसम गोवंशीय जनावराचे मांस विक्री करताना मिळून आला. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव कुरेशी नुर मोहम्मद शेख रफिक, वय 30 वर्षे, रा. धानोरा रोड, घोडापीर मोहल्ला. नंदुरबार असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सुमारे 40 किलो गोवंशीय जनावराचे मांस, तसेच मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारे 3 लोखंडी सुरे, 2 लोखंडी कुऱ्हाडी व 1 वजनकाटा. असा मु‌द्देमाल जप्त केला. प्राथमिक चौकशीत सदर मांस सलीम मुसा उर्फ सल्या. रा. कुरेशी मोहल्ला. नंदुरबार याने गोवंशाची कत्तल करून विक्रीसाठी दिल्याचे. तसेच कुरेशी नूर मोहम्मद शेख रफिक याने सदर मांस विक्रीसाठी घेतल्याचे समोर आले आहे. कत्तल करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, 1976 चे कलम 5.5 (क). 9 (अ) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भुणेश मराठे. अमोल देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल राहुल राठोड, अमित भरवाड, ललित गवळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल निंबाबाई वाघमोडे व पोलीस पथकाने केली. नंदुरबार शहर पोलिसांकडून अवैध कृत्यांविरुद्धची कारवाई यापुढेही प्रभावीपणे सुरूच राहणार आहे. अशा प्रकारच्या अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरात घडणाऱ्या संशयास्पद अथवा अवैध प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. असे आवाहन नंदुरबार शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: