Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ,...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्यात येत

0
Maharashtra State Road Transport Corporation is making travel easier, more transparent and more digital for various social segments.

दिशेने पुढचे पाऊल म्हणून ‘RuPay On-The-Go’, एनसीएमसी (NCMC) सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.

यावेळी अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक रमेश ढावरे, तसेच सवलतधारक महिला संगीता पालकर व वर्षा कांबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह सर्व मंत्री व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.