Home महाराष्ट्र देशात दरवर्षी ३४ लाख टन प्लास्टिक कचरा तयार होत आहे. यापैकी ४०...

देशात दरवर्षी ३४ लाख टन प्लास्टिक कचरा तयार होत आहे. यापैकी ४० टक्के प्लास्टिक अंतिमतः नदी, नाले व भूगर्भात जात आहे.

0
The country generates 3.4 million tonnes of plastic waste every year. Of this, 40 percent ends up in rivers, drains and groundwater.

प्लास्टिक प्रदूषणामुळे मत्यव्यवसाय, पर्यटन व आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्लास्टिकला योग्य पर्याय शोधावा लागेल आणि प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विभागातर्फे ‘प्लास्टिक उत्पादने व प्लास्टिक पॅकेजिंग आवरणांचा पर्यावरणावरील दुष्परिणाम’ या विषयावर आयोजित तज्ज्ञांच्या मुंबई येथे झालेल्या चर्चासत्रात केले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘वर्क इन प्रोग्रेस: रिड्युसिंग द प्लास्टिक फूटप्रिंट ऑफ प्रॉडक्ट्स अँड पॅकेजिंग’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

बैठकीला विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य शाश्वतता अधिकारी तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.