Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) तसेच मानकापूर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) तसेच मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल

0
Chief Minister Devendra Fadnavis inaugurated the Indira Gandhi Government Medical College (Mayo) and the Divisional Sports Complex at Mankapur.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शल्यचिकित्साशास्त्र विभाग, नेत्र विभाग यांच्या मॅाड्युलर ओ.टी., सिकलसेल व थॅलेसेमिया कक्षाची पाहणी केली. तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी वसतिगृह इमारतीला भेट देत त्यांनी पाहणी केली.

रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळाली पाहिजे आणि वैद्यकीयशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या पायाभूत सुविधा व शिक्षण मिळाले पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. कामाच्या दर्जाकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेषतः मेयो रुग्णालयातील वसतिगृहाचे सुरू असलेल्या बांधकामाकडे विशेष लक्ष द्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना पाहणीदरम्यान दिल्या.

यावेळी आमदार प्रवीण दटके, महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन शेंडे यांच्यासह संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.