Home महाराष्ट्र उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे आरोग्य सुविधांचा आढावा

उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे आरोग्य सुविधांचा आढावा

2
Review of health facilities at Sub-District Hospital Taloda

(तळोदा) नागरिकांना अधिक दर्जेदार, स्वच्छ आणि सुसज्ज आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज उपजिल्हा रुग्णालय (SDH) तळोदा येथे भेट देऊन विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील सुविधा, स्वच्छता, वैद्यकीय सेवा आणि नवजात शिशु व मातांसाठी उपलब्ध यंत्रणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

🩺 रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. NGO कडून देण्यात आलेले टीव्ही तात्काळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता राखणे, प्रत्येक बेडपाशी केस पेपर बॉक्स बसविणे आणि रुग्णांना अधिक सुसज्ज सुविधा देण्यावर भर देण्यात आला.

👩‍👦 मातृ व बाल आरोग्य सेवांवर विशेष लक्ष

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी प्रभावी समुपदेशन करण्याच्या सूचना देत प्रसूती पश्चात कक्ष (PNC Ward) अधिक सुसज्ज करण्यासाठी खिडक्या दुरुस्ती, पडदे, रंगकाम तसेच IEC चार्ट्स डिझाईन करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

👶 SNCU विभाग सुरू करण्यासाठी गती

नवजात शिशु अतिदक्षता विभाग (SNCU) सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे आणि स्वतंत्र वीज बॅकअपची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती, परिचारिकांचे प्रशिक्षण तसेच आवश्यक साधनसामग्रीची पूर्तता करण्यावर भर देण्यात आला.

📑 विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

PNC Ward, NRC आणि इतर आवश्यक कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले.

👨‍⚕️ यावेळी वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, OT कर्मचारी, लसीकरण विभाग, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग तसेच विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

#नंदुरबार#तळोदा#डॉमित्तालीसेठी#आरोग्यसेवा#SDHTaloda#MaternalHealth#ChildHealth#SNCU#PublicHealth#Nandurbar#Taloda#Healthcare#Maharashtra