
अभियानाचा आरंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता (दि. २६ मे) धारावी व सायन येथे होणार आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी व महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत धारावी येथील एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्र येथे तसेच ११.३० वाजता सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय येथे अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते क्षयरूग्णांना पोषण आहार किटचे वाटप देखील करण्यात येणार आहे.















