Home महाराष्ट्र पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर;आढावा बैठक, पत्रकार परिषद व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला...

पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर;आढावा बैठक, पत्रकार परिषद व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

0
Guardian Minister Hasan Mushrif on district tour; review meeting, press conference and visit to Government Medical College

(नंदुरबार) राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे 4 जून 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध विकासकामांचा आढावा, प्रशासकीय बैठक, पत्रकार परिषद तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी करणार आहेत.

दौऱ्यानुसार पालकमंत्री श्री. मुश्रीफ हे 4 जून रोजी सकाळी नंदुरबार येथे आगमनानंतर शासकीय विश्रामगृहात दाखल होतील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या कालावधीत खरीप हंगाम पूर्वतयारी, वीजपुरवठा, खते व इतर समस्यानिवारणाबाबत आढावा बैठक घेतील. तसेच शेतकरी, नागरिक आणि जनप्रतिनिधींशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.

दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून त्यानंतर पालकमंत्री काही वेळ राखीव ठेवणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नंदुरबार येथे भेट देऊन रुग्णालयातील सुविधा, वैद्यकीय सेवा आणि सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतील.

सायंकाळी 5.30 वाजता पालकमंत्री श्री. मुश्रीफ हे नागरिकांच्या भेटीगाठी घेणार असून त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळावा कार्यक्रमास उपस्थित राहतील. रात्री रेल्वेमार्गे मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. जिल्ह्यातील विविध विकासकामे, कृषी क्षेत्राची पूर्वतयारी, आरोग्य सेवा आणि नागरिकांच्या समस्या याबाबत पालकमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.