धोरणे आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत शिवनीबांध मत्स्य बीज केंद्र भाडेपट्टीने देण्याचा प्रस्ताव, मोर्शी (जि. अमरावती) येथील मत्स्यव्यवसाय व जलशेती पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत प्रस्तावित प्रकल्प, उजनी धरणात मत्स्यबीज सोडण्यासाठी प्लुटस सर्व्हिसेस या ठेकेदारास मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव तसेच शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र, धोम (ता. वाई, जि. सातारा) हे व्हीआरपी फिशरी प्रायव्हेट लिमिटेड यांना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शाश्वत विकास ध्येये अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित निर्देशकांमध्ये सुधारणा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, ससून डॉक सामंजस्य करारानंतरची कार्यवाही, मरोळ मच्छिमार मार्केट विकासाचा प्रगती अहवाल तसेच मच्छिमार महिलांसाठी हँडग्लोज व गमबूट उपलब्ध करून देण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
















