(नंदुरबार) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) चे मुंबई येथील डेप्युटी मुख्य कार्यकारी अधिकारी **श्री. रवींद्र हजारे** यांनी नंदुरबार, भालेर व नवापूर एमआयडीसी परिसराला भेट देत उद्योगांशी संबंधित विविध प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला.
उद्योजकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत लघुउद्योग भारतीचे **गजेंद्र चौधरी**, नवापूर एमआयडीसीचे अध्यक्ष **ईश्वर चौधरी**, **जी. बी. मोदी**, **प्रकाश कोचर**, घोडामिलचे संचालक **कृष्णा अग्रवाल**, **कमलेश जैन** यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते.
बैठकीत एमआयडीसीतील पायाभूत सुविधा, आवश्यक सेवांचा पुरवठा, उद्योगवाढीसाठी आवश्यक उपाययोजना तसेच उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
श्री. रवींद्र हजारे यांनी उपस्थितांनी मांडलेल्या समस्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विषयांवर महामंडळाच्या धोरणानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
उद्योगांना अधिक पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसी प्रशासन आवश्यक ती पावले उचलेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीमुळे नंदुरबार, भालेर आणि नवापूर एमआयडीसीतील उद्योजकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
#Nandurbar#MIDC#IndustrialDevelopment#Maharashtra#MSME#Entrepreneurs#Industry#BusinessGrowth#NandurbarNews#Development#IndustrialInfrastructure#MakeInMaharashtra
















