प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या बालगृह

निरीक्षणगृह आणि खुले निवारा गृहातील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा माटुंगा येथील बेहरामजी जीजीभाई होम फॉर चिल्ड्रन्स येथे झाला. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि बाल कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष गुणवंत गौरव व सत्कार सोहळा – २०२६ च्या कार्यक्रमास बाल कल्याण समिती अध्यक्ष […]
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या बालगृह
Children from the children's home who achieved remarkable success in the 10th and 12th-grade examinations by overcoming adverse circumstances.

निरीक्षणगृह आणि खुले निवारा गृहातील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा माटुंगा येथील बेहरामजी जीजीभाई होम फॉर चिल्ड्रन्स येथे झाला. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि बाल कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष गुणवंत गौरव व सत्कार सोहळा – २०२६ च्या कार्यक्रमास बाल कल्याण समिती अध्यक्ष महादेव सावंत, मुंबई शहर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार, बाल कल्याण समिती सदस्य श्याम मिस्त्री, अरुणा काटकर, मुग्धा दांडेकर, उषा गायकवाड यांच्यासह आशियाना फाउंडेशनचे विनोदभाई शाह, ग्रेस फाउंडेशनचे शंकर मुगलखोद, हमारा फाउंडेशनच्या प्रिया शेंडे, ऑल इज वेल फाउंडेशनचे प्रकाश राजन आदी उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: