पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या वारकरी बाळू आसाराम पडूळ (वय ५४) यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने

ॲम्ब्युलन्स सोलापूर विमानतळावर पोहोचताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची विमातळावर भेट घेऊन चौकशी केली. मुख्यमंत्र्यांनी पडूळ यांच्यावर आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापौर विनायक कोंड्याल आदी उपस्थित होते. आषाढीवारीच्या इतिहासात एअर ॲम्ब्युलन्स सेवेद्वारे प्रथमच रुग्णावर उपचार करण्यात आले. दरम्यान त्यांना सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात […]
पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या वारकरी बाळू आसाराम पडूळ (वय ५४) यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने
Warkari Balu Asaram Padul (age 54), who had come from Chhatrapati Sambhajinagar to Pandharpur for the darshan of Shri Vitthal-Rukmini, suddenly began to feel unwell.

ॲम्ब्युलन्स सोलापूर विमानतळावर पोहोचताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची विमातळावर भेट घेऊन चौकशी केली. मुख्यमंत्र्यांनी पडूळ यांच्यावर आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापौर विनायक कोंड्याल आदी उपस्थित होते.

आषाढीवारीच्या इतिहासात एअर ॲम्ब्युलन्स सेवेद्वारे प्रथमच रुग्णावर उपचार करण्यात आले. दरम्यान त्यांना सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे हृदयरोगतज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिली.

आषाढीसाठी आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी यावर्षी राज्य शासनाने प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे गंभीर रुग्णांना तात्काळ मोठ्या रुग्णालयात हलवणे शक्य झाले आहे.

#पंढरपूरवारी२०२६#आषाढीएकादशी#आषाढीवारी#पंढरीचीवारी#पंढरपूर#आरोग्यसेवा#एअरॲम्ब्युलन्स#वारकरी#सोलापूर#सोलापूरविमानतळ#रुग्णसेवा#PandharpurWari2026#PandharpurDiaries#AirAmbulance

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: