“ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे” औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील आरोग्य संस्थांमधील औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’ या उपकरणाद्वारे प्रायोगिक तत्त्वावर आरोग्य संस्थांमधील औषध गुणवत्ता तपासणी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
“ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे” औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
prakash-abitkar-strengthen-drug-quality-detection-machines

मुंबईतील आरोग्यसेवा आयुक्तालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. राज्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देताना औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात येत आहे. राज्यातील सर्व आरोग्य संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या औषध साठ्याची गुणवत्ता ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे तपासण्यात येणार आहे. या तपासणीसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात येणार असून पथकांद्वारे राज्यातील आठही परिमंडळातील संस्थेमध्ये तपासणी केली जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून सर्व आरोग्य संस्थांमधील औषधांची गुणवत्ता यात तपासली जाणार आहे.

 

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: