पुनर्विकासानंतरही अबाधित राहावेत, यासाठी शाश्वत व कायदेशीरदृष्ट्या सक्षम तोडगा काढण्याच्या दृष्टीने विधानभवन येथे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या जागेसंदर्भात कायदेशीरदृष्ट्या सक्षम, व्यवहार्य आणि दीर्घकालीन हित लक्षात घेऊन मसुदा तयार करण्याचे निर्देश उपसभापती सचिन अहिर यांनी यावेळी दिले.
बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त किरण दिघावकर, कार्यकारी अभियंता (विकास नियोजन) प्रशांत कामत, उपसंचालक युवा सेवा शेखर बांगर तसेच आखाड्याचे विश्वस्त व सभासद उपस्थित होते.
















