Home टेक न्युज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शकता वाढवून, कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करून

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शकता वाढवून, कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करून

1
By enhancing transparency through technology and simplifying the tax payment process

‘एकेकाळी ‘भीतीदायक’ म्हणून ओळखला जाणारा आयकर विभाग आज ‘जनस्नेही मित्र’ बनला आहे,” असे गौरवोद्गार राज्यपालांनी आयकर विभागाच्या १६७ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात काढले.

भारत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना आयकर विभागाचे योगदान अधिक महत्वाचे असल्याचे राज्यपालांनी सांगितले. कर महसुलामुळे देशात सार्वजनिक शाळा, रुग्णालये, रस्ते, पायाभूत सुविधा तसेच विविध कल्याणकारी योजनांची उभारणी शक्य झाली असून, देशाच्या प्रगतीत विभागाचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील कौटिल्य भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास मुंबईचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आलोक कुमार, अभिनेते विकी कौशल उपस्थित होते.