
(नंदुरबार) मा.जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तसेच तालुका पुरवठा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी विविध महत्त्वाच्या विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
नियमित धान्य वाटप सुरळीतपणे पार पाडणे, लाभार्थ्यांची e-KYC प्रक्रिया गतीने पूर्ण करणे, मयत लाभार्थ्यांची नावे वगळणे, साखर वाटपाची अंमलबजावणी, नो-नेटवर्क क्षेत्रातील रास्तभाव दुकानांची तपासणी, शिधापत्रिकांशी मोबाईल क्रमांक संलग्न करणे तसेच पुनर्वसन गावांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मा.जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी विभागांतर्गत सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देत, कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेश दिले.
तसेच अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यातील अतिदुर्गम भागांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करून नागरिकांची शिधापत्रिकेसंदर्भातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
#नंदुरबार#डॉमित्तालीसेठी#सार्वजनिकवितरणप्रणाली#शिधापत्रिका#eKYC#अन्नसुरक्षा#रास्तभावदुकान#सुशासन#जिल्हाप्रशासननंदुरबार















