
सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विश्वासार्ह आणि पारदर्शक व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. पेट्रोकार्डसारख्या अभिनव उपक्रमामुळे रुग्णवाहिकांच्या इंधन खरेदी व्यवस्थापनासह आर्थिक पारदर्शकता येईल व कामकाजातील अनावश्यक विलंब कमी होईल. आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि संपूर्ण यंत्रणा अधिक उत्तरदायी बनेल.”
यावेळी आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनिता गोलाईत, प्रकल्प संचालक (ईएमएस) रवींद्र सावंत, उपसंचालक जयंत मुळे तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे संचालक विजय कंदेवाड आणि राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.















