Home नंदुरबार जिल्हा लघु पाटबंधारे योजना खडकुना धरण व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस, नदीकाठावरील...

लघु पाटबंधारे योजना खडकुना धरण व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस, नदीकाठावरील ग्रामस्थांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा

1
Heavy rainfall in the catchment area of ​​the Khadkuna minor irrigation dam; the administration has issued an alert to villagers living along the riverbanks.

नंदुरबार(प्रतिनिधी):-कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे या विभागांतर्गत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खडकुना येथील लघु पाटबंधारे योजना या प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे, सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, सद्यास्थितीत पाणी पातळी प्रकल्पाच्या पुर्ण संचय पातळी 91.50 मी ची नोंद झाली आहे; त्या अन्वये सदर प्रकल्पात 100% क्षमतेने पाणीसाठा झाला असून सदर प्रकल्पाच्या सांडव्यावरुन सुमारे 1993.67 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग चालु होऊ शकतो.
तरी कांजी नाला काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, कांजी नाला काठावरील  खडकुना, पेचरीदेव, मंडारा, नवागांव, बोगवध (गुजरात) पोरंबी व इतर ठिकाणी असलेल्या ग्रामस्थानी  नदीपात्रामध्ये गुरढोरे सोडण्यात येऊ नये व कोणत्याही मनुष्याने नदीपात्रात जावू नये, तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, तरी आपल्या यंत्रणेव्दारे नदीकाठच्या गावांना सावधगिरी व सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत.