
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन बालके तसेच युवकांना पैशांचे आमिष दाखवून आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी चेतन प्रकाश कोळी (वय 22 रा. रायसिंगपुरा, नंदुरबार) यास पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपीच्या पोलीस कोठडीदरम्यान करण्यात आलेल्या सखोल चौकशीत या प्रकरणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले असून. आतापर्यतच्या तपासादरम्यान अनेक बालके व युवक या प्रकारच्या शोषणास बळी पडल्याची माहिती तपासात धक्कादायक बाब उघड झाली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख व त्यांचे पथक करीत आहे. नागरिक व पालकांना नंदुरबार शहर पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन
नंदुरबार शहर पोलीस दलातर्फे सर्व नागरिक, पालक व युवकांना आवाहन करण्यात येते की. आपल्या कुटुंबातील अथवा परिसरातील मुले व युवक कोणत्याही प्रकारच्या ब्लॅकमेलिंग, धमकी किंवा शोषणाला बळी पडत असल्याचे आढळून आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. भीती बाळगू नका. पुढे या आरोपीच्या भीतीपोटी किंवा सामाजिक प्रतिष्ठेच्या कारणास्तव ज्या बालकांनी किंवा युवकांनी अद्याप पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. त्यांनी कोणतीही भीती अथवा संकोच न बाळगता पोलिसांशी संपर्क साधावा. पीडितांची गोपनीयता राखली जाईल विशेषतः अल्पवयीन पीडितांच्या बाबतीत कायद्यानुसार त्यांची ओळख नाव व वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.
पोलिसांना सहकार्य करा या गंभीर प्रकरणासंदर्भात कोणाकडेही माहिती. पुरावे अथवा संबंधित व्यक्तींबाबत माहिती असल्यास त्यांनी तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.















