Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यात गाभा समिती व नवसंजीवनी योजना आढावा बैठक

नंदुरबार जिल्ह्यात गाभा समिती व नवसंजीवनी योजना आढावा बैठक

3
Core Committee and Navsanjeevani Scheme Review Meeting in Nandurbar District

मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय गाभा समिती व नवसंजीवनी योजनेची बैठक पार पडली. बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

1. रेशन कार्ड संदर्भात :

• धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील प्रत्येकी 15 गावांमधील प्रलंबित रेशनकार्ड प्रकरणे एक महिन्याच्या आत कॅम्पद्वारे ऑनलाइन करण्याचे निर्देश.

• जिल्ह्यातील रेशनकार्ड शंभर टक्के ऑनलाइन करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करणे.

2. अंगणवाडी कामकाज :

• मंजूर असूनही काम सुरू न झालेल्या अंगणवाडींसाठी कार्यारंभ आदेश देऊन तातडीने कामे सुरू करण्याचे निर्देश.

• सुरू होऊन बंद पडलेल्या अंगणवाडींचे कामकाज एक महिन्यात पुन्हा सुरू करण्याचे आदेश.

• ज्या ठिकाणी अंगणवाडी अस्तित्वात नाहीत, तिथे प्रस्ताव तयार करून बांधकामाची मंजुरी घेऊन पूर्ण करणे.

• जिल्ह्यात कोणतीही अंगणवाडी प्रलंबित राहू नये यावर भर.

3. आरोग्य सेवा :

• आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश.

• ॲम्बुलन्स दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध करून तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश.

• कुपोषित बालके व गरोदर मातांची नियमित आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार उपलब्ध करून देणे.

• संपूर्ण जिल्ह्यात 100% सिकलसेल तपासणी राबविण्याचा निर्णय.

• आरोग्य सुपरवायझर यांनी नियमित अंगणवाडी भेट देऊन गरोदर माता व बालकांच्या आरोग्य अहवाल वेळेत सादर करणे.

4. मनरेगा व स्थलांतरित मजूर :

• स्थलांतरित होणाऱ्या व्यक्तींसाठी नंदुरबार जिल्ह्यातील 225 गावांमध्ये मनरेगा अंतर्गत 150% कामांचा सेल्फ मंजूर.

• बाहेरगावी कामासाठी जाणाऱ्या व्यक्तींकरिता हेल्पलाइन नंबर जाहीर; त्यांना आवश्यक मदत पुरविण्याचा निर्णय.

5. आरोग्य सुविधा विस्तार :

• ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नाही, तिथे नवीन आरोग्य केंद्र बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश.

ही बैठक जिल्ह्यातील अंगणवाडी, आरोग्य सेवा, रेशनकार्ड प्रक्रिया व स्थलांतरित कामगार कल्याण या सर्व महत्त्वाच्या विषयांवर ठोस निर्णय घेणारी ठरली.

#Nandurbar#GabhaSamiti#NavSanjiwaniYojana#DrMitaliSethi#HealthCare#Anganwadi#MNREGA#SickleCell#Employment