
(नंदुरबार)
केंद्र सरकारच्या आदिवासी कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान 2025 अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये आज पहिल्या दिवशी एकात्मिक लाभ वितरण शिबिरे यशस्वीपणे पार पडली.
या अभियानाचा उद्देश आदिवासी समुदायातील प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाच्या योजनांचा थेट लाभ पोहोचविणे आणि त्यांचे सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण साधणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व विभाग आणि ग्रामपंचायतींच्या समन्वयातून ही मोहीम व्यापक स्तरावर सुरू झाली आहे.
शहादा तालुका – ग्रामपंचायत लोणखेडा व वस्तराव नाईक हायस्कूल
उपस्थित मान्यवर: मा. कृष्णकांत कनवारिया (उपविभागीय अधिकारी, शहादा), मा. दीपक गिरासे (तहसीलदार, शहादा)
एकूण लाभार्थी: 376
एकूण वितरित दाखले: 360+
(आधार नोंदणी, आयुष्यमान कार्ड, उत्पन्न, डोमिसाईल, जात, नॉन क्रिमिलिअर, जन्म, मृत्यू व विवाह नोंदणीचे दाखले)
तळोदा तालुका – आश्रमशाळा शिर्वे व ग्रामपंचायत आमलाड
उपस्थित मान्यवर: मा. आमदार राजेश पाडवी, अनय नावंदर (सहा. जिल्हाधिकारी), तहसीलदार, गटविकास अधिकारी
एकूण लाभार्थी: 265
एकूण वितरित दाखले: 130+
नवापूर तालुका – ग्रामपंचायत विसरवाडी व लक्कडकोट
उपस्थित मान्यवर: मा. गटविकास अधिकारी देवरे व विविध विभागांचे अधिकारी
एकूण लाभार्थी: 307
एकूण वितरित दाखले: 133
(उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास, डोमिसाईल, जॉब कार्ड, जिवंत 7/12 इ.)
धडगाव तालुका – धनाजे बु. व काकरदा
उपस्थित मान्यवर: तहसीलदार व गटविकास अधिकारी
एकूण लाभार्थी: 135
एकूण वितरित दाखले: 98
अक्कलकुवा तालुका – सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, सोरापाडा
यशस्वी आयोजन, विविध योजनांचे लाभ व दाखले वाटप
नंदुरबार तालुका – नंदुरबार पंचायत समिती व ग्रामपंचायत वाघाळे, विभागीय सहभाग: पंचायत समिती, कृषी, आरोग्य, तलाठी, आधार, इत्यादी
उपस्थित मान्यवर: मा. मिलिंद कुलथे, तहसीलदार नंदुरबार, श्री किरण मोरे, सहा. प्रकल्प अधिकारी आदिवासी प्रकल्प कार्यालय नंदुरबार, श्री सागर राजपूत, विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती नंदुरबार
एकूण लाभार्थी: 183
एकूण वितरित दाखले: 86
(उत्पनाचे दाखले – 41, डोमासाईल -12, जिवंत 7/12- 40,रहिवास- 02, जॉब कार्ड- 02 इ.)
तसेच विविध योजनांचे फॉर्म भरून घेण्यात आले
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम जिल्ह्यात १५ जून ते ३० जून २०२५ दरम्यान प्रभावीपणे राबविला जात असून पहिल्याच दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. शेकडो लाभार्थ्यांनी विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतला.
नंदुरबार जिल्हा प्रशासन जनतेला हक्काचे लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.
#धरतीआबा_अभियान#PMDAJGUA#NandurbarForTribes
#TribalEmpowerment#DigitalGovernance#LastMileDelivery
#NandurbarDistrict#AdiwasiVikas#Jansanvad#SarkarApkeDwaar















