
या समितीने कलाकेंद्र व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याबाबतचा निर्णय पुढील १५ दिवसात द्यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.
पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे तमाशा कलावंताच्या विविध प्रश्नासंदर्भात मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभिषण चवरे, गृह विभागाचे उपसचिव अ.नि.साखरकर, अवर सचिव बाळासाहेब सावंत, अखिल भारतीय लोक कलावंत मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव, सल्लागार खंडुराज गायकवाड, अविष्कार मुळे, किरणकुमार ढवळपुरीकर, रघुवीर खेडकर, शेषराव गोपाळ, आनंद भिसे, सुनिल वाडेकर उपस्थित होते.















