Home महाराष्ट्र आपल्या परिवारातील कर्ता पुरुष गेल्यानंतर आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी...

आपल्या परिवारातील कर्ता पुरुष गेल्यानंतर आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी अनुकंपा तत्त्वावरील नोकरीची अत्यंत गरज असते.

4
There is a dire need for compassionate employment to support families who are financially and emotionally drained after the passing of the breadwinner.

अशावेळी अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहून संबंधित पात्र उमेदवाराला लवकरात लवकर नोकरी देऊन त्याला आर्थिक स्थैर्य कसे मिळेल हे पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या मुख्यालयात ७० उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नोकरीचे नियुक्तीपत्र देण्याच्या समारंभात केले. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख यांच्यासह उमेदवारांचे कुटुंबीय व एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.