
या कार्यक्रमाला राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार परिणय फुके, आमदार धर्मरावबाबा आत्राम, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोहखनिजाचे पर्यावरणपूरक वहन करणार्या् ९ ट्रक्सला झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. या सर्व ट्रक्स ‘आयर्न वुमन कार्यक्रमा’अंतर्गत महिला चालवणार आहेत.















