
नंदुरबार,
नंदुरबार जिल्ह्यात समुदायस्तरीय सार्वजनिक आरोग्य व पोषण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘Community Health Innovations Summit – Nandurbar’ या तीन दिवसीय समिटला सुरुवात झाली आहे. हा समिट दिनांक 16 ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला असून, नंदुरबार जिल्हा आरोग्य प्रशासन व Khushi Baby यांच्या भागीदारीत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या समिटमध्ये जिल्ह्यातील विविध शासकीय विभाग, विकास भागीदार संस्था, संशोधक, नवोपक्रम करणारे तज्ज्ञ आणि क्षेत्रीय स्तरावरील आरोग्य कर्मचारी एकत्र येऊन माता-बाल आरोग्य व पोषणाशी संबंधित गंभीर मुद्द्यांवर सखोल चर्चा करणार आहेत.
समिटची प्रमुख उद्दिष्टे:
नंदुरबार जिल्ह्यातील माता-बाल कुपोषण, आजारपण व मृत्यूदरामागील कारणांचा अभ्यास करणे, स्थानिक समुदायांशी थेट संवाद साधून बदल घडवू शकणाऱ्या घटकांची ओळख पटवणे, जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या क्षमतांचा आढावा घेऊन समन्वयाच्या संधी शोधणे, तसेच तंत्रज्ञान व डेटा सायन्सच्या मदतीने आरोग्य सेवांची परिणामकारकता वाढवणे, ही या समिटची मुख्य उद्दिष्टे आहेत.
पहिल्या दिवसाचा आढावा:
समिटचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि मा. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते दीपप्रज्वललाने झाले. यावेळी डॉ. सेठी यांनी नंदुरबारसारख्या आदिवासी व दुर्गम जिल्ह्यात समुदायाच्या सहभागातून आरोग्य व पोषण क्षेत्रात शाश्वत बदल घडविण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
यानंतर Khushi Baby चे CEO डॉ. रुचित नागर यांनी समिटची भूमिका व पुढील तीन दिवसांचा आराखडा मांडला. CM Fellows मानसी एंडोले व सानिका नाईक यांच्या संयोजनाखाली आरोग्य व ICDS विभागांची गोलमेज चर्चा झाली. यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख अडचणी, गरजा आणि विकास भागीदारांकडून अपेक्षित सहकार्य यावर मंथन करण्यात आले. दिग्विजय शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन यशस्वीपणे केले.
भागीदार संस्थांचे सादरीकरण:
JHPIEGO, ARMMAN, Narmada Navnirman, Feeding India, Britannia Nutrition Foundation, Khushi Baby, SELCO Foundation, PATH, CYDA तसेच इतर स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या कामाचा आढावा सादर केला. दुपारनंतर क्षेत्रभेटी आणि विषयानुसार कार्यगट चर्चांचे आयोजन करण्यात आले.
उपस्थित मान्यवर:
या कार्यक्रमास मा. SDM अनय नवंदर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, DPO शशांक काळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी H. M. हाके, CDPO तळोदा सागर वाघ, स्त्रीरोगतज्ञ संतोष परमार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जाफर तडवी, डोंगरपाडा अंगणवाडी सेविका – बबिता पाडवी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या समिटमधून जिल्ह्यासाठी Integrated Health Dashboard, समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तंत्रज्ञानाधारित साधने, आरोग्य कृती आराखडा व प्रभावी मॉनिटरिंग-मूल्यांकन प्रणाली विकसित होण्याची अपेक्षा आहे.
नंदुरबार जिल्ह्यात माता-बाल आरोग्य व पोषण क्षेत्रात दीर्घकालीन, परिणामकारक बदल घडविण्याच्या दिशेने हा समिट एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
(Collectorofficenandurbar)
#CommunityHealthSummit#MaternalChildHealth#PublicHealth#Nutrition#HealthInnovation#KhushiBaby#DistrictHealthAdministration#IntegratedHealth#HealthyNandurbar















