राज्यातील १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधीत क्षमापित पत्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. गेली २० वर्ष प्रलंबित असलेल्या या प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांचे आभार मानले. यावेळी डॉक्टरांनी लोकांना अधिक चांगली आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी पार पाडावी. चांगले काम करावे. तुमच्या हक्काच्या गोष्टी देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री आबिटकर म्हणाले.
















