Home नंदुरबार जिल्हा घोटाणे व मालपूर येथे मा. जिल्हाधिकारी यांची शेळीपालन व दुग्धव्यवसायाशी संबंधित उपक्रमांना भेट

घोटाणे व मालपूर येथे मा. जिल्हाधिकारी यांची शेळीपालन व दुग्धव्यवसायाशी संबंधित उपक्रमांना भेट

0
घोटाणे व मालपूर येथे मा. जिल्हाधिकारी यांची शेळीपालन व दुग्धव्यवसायाशी संबंधित उपक्रमांना भेट
Hon'ble District Collector visits goat farming and dairy related activities in Ghotane and Malpur

नंदुरबार जिल्ह्यातील शेळीपालन व दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी घोटाणे व मालपूर परिसरातील विविध उपक्रमांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

घोटाणे येथील झालावाडी शेळी जातीच्या शेळीपालक श्रीमती इंदूबाई देविदास पाटील यांच्या शेळीपालन उपक्रमास मा. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शेळीचे दूध काढण्याची प्रक्रिया पाहिली तसेच शेळीच्या दुधाचा बाजारभाव याबाबत शेळीपालकांकडून माहिती घेतली. शेळ्यांसाठी शेड कोणत्या पद्धतीने उभारावे, किती शेळ्यांसाठी किती जागा आवश्यक आहे व त्यासाठी येणारा खर्च याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेळीपालकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यानंतर मा. जिल्हाधिकारी यांनी मालपूर येथे फीड युनिटला भेट दिली. तसेच मालपूर येथील दूध शीतकरण केंद्राची पाहणी केली. या दुधापासून सध्या कोणते पदार्थ तयार केले जात आहेत, याची माहिती घेतली. शेळीच्या दुधापासून दही, चीज यांसारखे मूल्यवर्धित पदार्थ जागेवरच तयार करून शेळीपालकांना अधिक उत्पन्न मिळवून देता येईल, यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच शेळीच्या लेंडीपासून सेंद्रिय खत (फर्टिलायझर) तयार करता येण्याच्या संधींबाबतही चर्चा करण्यात आली. शेळी शेडला भेट देऊन त्या पद्धतीने शेड बांधण्यासाठी येणाऱ्या खर्चाचीही त्यांनी चौकशी केली.

त्यानंतर ASF कार्यालय, मालपूर येथे भेट देण्यात आली. येथे मूत्र डिस्टिलेशन पॉइंटची पाहणी करण्यात आली तसेच प्रशिक्षणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असलेली निवास व्यवस्था पाहण्यात आली.

या दौऱ्यादरम्यान शेळीपालन, दुग्धव्यवसाय, प्रक्रिया उद्योग आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात उत्पन्नवाढ व रोजगारनिर्मितीच्या मोठ्या संधी असल्याचे मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्पष्ट केले. स्थानिक शेळीपालक व उद्योजकांनी मूल्यवर्धन, प्रशिक्षण आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब करून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

(Collector Office Nandurbar)

#goatfarmingIndia#MilkProcessing#SustainableAgriculture

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here