Home महाराष्ट्र हिंद दी चादर उपक्रमांतर्गत नेमसुशिल विद्यामंदिरात विविध कार्यक्रम

हिंद दी चादर उपक्रमांतर्गत नेमसुशिल विद्यामंदिरात विविध कार्यक्रम

3
Various programs at Nemasushil Vidya Mandir under Hind Di Chadar initiative

हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर सिंग साहेब जी यांच्या 350 व्या शहीद समागमा निमित्त तळोदा येथील नेमसुशील माध्यमिक विद्यामंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.                       

    या प्रसंगी मुख्याध्यापक सुनील परदेशी यांनी विद्यार्थ्यांना श्री गुरु तेग बहादुर सिंग साहेब जी यांचे जीवन चरित्र व बलिदानाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना श्री गुरु तेग बहादूर सिंग जी साहेब यांच्या जीवनावर आधारित लघुपट दाखविण्यात आला.
विद्यार्थ्यांना गुरू तेग बहादूर यांचे कार्य व योगदान बद्दल विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेमध्ये सुद्धा उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला.

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका भावना डोंगरे, रवींद्र गुरव, मुकुंदा महाजन व इच्छाराम बैसाने यांनी परिश्रम घेतले.या प्रेरणादायी कार्यक्रमाचे संस्थाध्यक्ष निखीलभाई तुरखीया, संचालिका सोनाबेन तुरखीया,उपाध्यक्ष दगेसिंग महाले ,सचिव संजय भाई पटेल, संस्था समन्वयक हर्षिल तुरखीया यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले.