Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार येथे ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन 2026’ यशस्वीपणे संपन्न

नंदुरबार येथे ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन 2026’ यशस्वीपणे संपन्न

2
'Maha Narayant Ignite Convention 2026' successfully concluded in Nandurbar

(नंदुरबार) महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या वतीने नंदुरबार येथे दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन 2026’ कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

या कन्व्हेन्शनचा मुख्य उद्देश नंदुरबार जिल्ह्यातील एमएसएमई क्षेत्राला निर्यातीसाठी प्रोत्साहन देणे, एक जिल्हा – एक उत्पादन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध उद्योगविषयक योजना व सवलती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणे हा होता.

कार्यक्रमास उद्योग विभागाच्या उद्योजिका वृषाली सोने (उद्योग सहसंचालक, नाशिक विभाग), श्री. सौम्या रंजन पात्रा (कार्यकारी संचालक, ECGC Ltd., पुणे), निर्यात समन्वयक श्री. सुरज जाधव, सौ. रुपाली चांडक, श्री. अक्षय शहा (FIEO), आयडीबीआय कॅपिटलचे सहाय्यक व्यवस्थापक श्री. मुकुंद तिवारी, न्यू इंडिया जनरल इन्शुरन्सचे श्री. राहुल आवचार, EXIMASSIST चे संचालक श्री. दिनेश देवरे, इंडिया पोस्टचे श्री. अमोल साळुंखे, मैत्री मुंबई कक्षाचे नोडल अधिकारी श्री. किशोर गिरोला, सौ. शामली बॅनर्जी (रीजनल डायरेक्टर, EPCES–SEEPZ), DGFT मुंबईचे श्री. हर्ष लोहिया तसेच जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योजक, गुंतवणूकदार, निर्यातदार व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतात मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक उत्पादनांना निर्यातीस मोठा वाव असल्याचे नमूद करत उद्योजकांना प्रशासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. तसेच एमआयडीसी क्षेत्रात ड्राय पोर्ट उभारणीसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली.

उद्योग सहसंचालक सौ. वृषाली सोने यांनी नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून वर्गीकृत असून उद्योग धोरणांतर्गत उपलब्ध विविध सवलती व योजनांची सविस्तर माहिती दिली. श्री. मुकुंद तिवारी यांनी भांडवली गुंतवणूक योजनांबाबत मार्गदर्शन केले, तर श्री. सौम्या रंजन पात्रा यांनी निर्यात जोखीम व विमा संरक्षणाबाबत माहिती दिली.

इंडिया पोस्टचे श्री. अमोल साळुंखे यांनी उद्योजकांसाठी डिजिटल सेवा व किफायतशीर लॉजिस्टिक सुविधांची माहिती दिली. EXIMASSIST चे श्री. दिनेश देवरे यांनी परदेशी आयातदार शोधणे, निर्यात परवाने व प्रक्रिया यावर अनुभवाधारित मार्गदर्शन केले. मैत्री 2.0 पोर्टल, SEZ व निर्यात सुलभतेबाबतही उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी प्र. महाव्यवस्थापक श्री. निबांजी पितांबर पाटील, जिल्हा उद्योग केंद्र, नंदुरबार यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.