Home महाराष्ट्र २३ एप्रिल रोजी लोकशाही जागरातून शंभर टक्के मतदानाचे आवाहन राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या...

२३ एप्रिल रोजी लोकशाही जागरातून शंभर टक्के मतदानाचे आवाहन राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती उपक्रम

1
A call for 100 percent voting from Democracy Awareness on April 23 Voter awareness campaign in the backdrop of Rahuri Assembly by-elections

अहिल्यानगर- राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे यासाठी जिल्हा स्वीप समितीच्या वतीने “२३ एप्रिलचा लोकशाही जागर” हा व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.

मतदानाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून निर्भय, निष्पक्ष व सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन स्वीप समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

​भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संध्या गायकवाड यांच्या संकल्पनेतून दि. १८ ते २२ एप्रिल या कालावधीत राहुरी विधानसभा मतदारसंघातील शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, महिला बचत गट तसेच आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

​या उपक्रमांतर्गत दि. १८ एप्रिल रोजी मतदानाची शपथ दिली जाणार असून, १९ एप्रिल रोजी मतदान जनजागृतीसाठी डीपी स्टेटस ठेवणे, २० एप्रिल रोजी प्रसिद्ध व्यक्तींचे जनजागृतीपर व्हिडिओ प्रसारित करणे आणि २१ एप्रिल रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्भय मतदानासाठी आवाहन करणे इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच २२ एप्रिल रोजी मतदानाची तारीख, वेळ व आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती देण्यात येणार आहे.

​यावेळी नागरिकांना “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणुकीचे पावित्र्य राखू तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करू” अशी शपथ देण्यात येत आहे.

​राहुरी विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांनी २३ एप्रिल रोजी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) आकाश दरेकर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) मीना शिवगुंडे, मतदारदूत डॉ. अमोल बागूल तसेच स्वीप समितीच्या इतर सदस्यांनी केले आहे.

#RahuriVotes#LokshahiJagar#SVEEP#Election2026#CentPercentVoting#VoterAwareness#RahuriByePoll#DemocracyFestival#BeAnEnlightenedVoter#EthicalVoting#GoVote#अहिल्यानगर#राहुरी#मतदान_जागर#लोकशाहीचा_उत्सव#निर्भय_मतदान