Home महाराष्ट्र जर्मनीचे वाणिज्यदूत यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार...

जर्मनीचे वाणिज्यदूत यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली.

4
A delegation from the German Consul paid a goodwill visit to Deputy Chief Minister and Minister for Finance and Planning Ajit Pawar.

या बैठकीत महाराष्ट्र–जर्मनी सहकार्याच्या विद्यमान प्रकल्पांचा आढावा घेऊन महाराष्ट्र–बॅडन वुर्टेम्बर्ग भागीदारी, कौशल्य स्थलांतर व व्यावसायिक प्रशिक्षण कराराची प्रगती तसेच भाषा प्रशिक्षणासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या शिष्टमंडळात जर्मनीचे वाणिज्यदूत ख्रिस्तोफ हॅलियर व जर्मनीचे उपवाणिज्यदूत ख्रिस्तोफ रेंडटॉर्फ यांचा समावेश होता.

येत्या काळात महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात हरित ऊर्जा, शाश्वत गतिशीलता, स्मार्ट सिटी, संशोधन व स्टार्टअप इकोसिस्टीम, उच्च शिक्षण देवाणघेवाण आणि सांस्कृतिक संबंध विस्तार या क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यासाठी महाराष्ट्र–जर्मनी संयुक्त संचालन समिती स्थापन करणे आवश्यक आहे. जर्मन उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करताना भासणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.