हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने शासनाकडून महिला लोकशाही दिन उपक्रम राबविण्यात येतो. शासन निर्णय क्र. मलोदि-२०१३/प्र.क्र.११/मकक दि. ४ मार्च २०१३ नुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो.
याच अनुषंगाने मार्च महिन्यातील महिला लोकशाही दिन सोमवार, दि. १६ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रंगावली सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे होणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या तक्रारी, अडचणी व समस्या शासकीय यंत्रणेकडून ऐकून त्यावर मार्गदर्शन व सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध होण्यास मदत होते.
तक्रारदार महिलांनी आपल्या समस्यांबाबतचे तक्रार अर्ज घेऊन दि. १६ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात स्वतः उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्यास महिलांना ऑनलाइन माध्यमातूनही तक्रार मांडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाइन सहभागी होण्यासाठी महिलांनी दुपारी १.०० ते २.०० या वेळेत खालील लिंकवरून सहभागी होऊन आपली तक्रार मांडू शकतात:
https://meet.google.com/ber-wrvp-kmp
या महिला लोकशाही दिनात नोंदविण्यात येणारी तक्रार वैयक्तिक स्वरूपाची असणे आवश्यक आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणे, आस्थापना विषयक बाबी तसेच सामूहिक तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
#mahilalokshahidin#womenempowermentmovement#PublicGrievance#collectorofficenandurbar
















