Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार येथे पशुसंवर्धन विभागाची एकदिवसीय तांत्रिक कार्यशाळा संपन्न

नंदुरबार येथे पशुसंवर्धन विभागाची एकदिवसीय तांत्रिक कार्यशाळा संपन्न

0

One-day technical workshop of Animal Husbandry Department concluded in Nandurbar

जिल्ह्यातील पशुधनाच्या आरोग्य संरक्षणासाठी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील तांत्रिक बाबींवर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत एकदिवसीय तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दिनांक १० मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद नंदुरबार येथील याहा मोगी सभागृहात ही कार्यशाळा पार पडली.

सदर कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. चंद्रकांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यातील पशुधनावर उद्भवणाऱ्या आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन मा. डॉ. बाबुराव नरवाडे, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नाशिक विभाग, नाशिक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी तसेच पशुधन पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेदरम्यान विविध तांत्रिक विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यात डॉ. मिलिंद भणगे, सहाय्यक आयुक्त, विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, नाशिक; डॉ. स्वप्निल लोणकर, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुचिकित्सालय पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) आणि डॉ. रवी सोनकांबळे, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुचिकित्सालय (ता. नवापूर) यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत डॉ. संजय खाचणे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी सध्या सुरू असलेल्या लाल खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरणाच्या आठव्या फेरीचे नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तुषार गीते, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा कार्यालय यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. मनोज पावरा, पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नंदुरबार, श्री. राजेंद्र गावित, पशुधन पर्यवेक्षक, पशुचिकित्सालय गव्हाळी (ता. अक्कलकुवा), श्री. प्रवीण निकम, कनिष्ठ लिपिक, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नंदुरबार तसेच श्री. लक्ष्मीकांत खैरनार यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यशाळेमुळे पशुधनाच्या आरोग्य व्यवस्थापनाबाबत अधिक सक्षम आणि प्रभावी पद्धतीने काम करण्यासाठी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळाले.

#animalhusbandrydepartment#LivestockHealth#VeterinaryServices#collectorofficenandurbarजिल्ह्यातील पशुधनाच्या आरोग्य संरक्षणासाठी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील तांत्रिक बाबींवर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत एकदिवसीय तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दिनांक १० मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद नंदुरबार येथील याहा मोगी सभागृहात ही कार्यशाळा पार पडली.

सदर कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. चंद्रकांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यातील पशुधनावर उद्भवणाऱ्या आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन मा. डॉ. बाबुराव नरवाडे, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नाशिक विभाग, नाशिक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी तसेच पशुधन पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेदरम्यान विविध तांत्रिक विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यात डॉ. मिलिंद भणगे, सहाय्यक आयुक्त, विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, नाशिक; डॉ. स्वप्निल लोणकर, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुचिकित्सालय पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) आणि डॉ. रवी सोनकांबळे, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुचिकित्सालय (ता. नवापूर) यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत डॉ. संजय खाचणे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी सध्या सुरू असलेल्या लाल खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरणाच्या आठव्या फेरीचे नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तुषार गीते, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा कार्यालय यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. मनोज पावरा, पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नंदुरबार, श्री. राजेंद्र गावित, पशुधन पर्यवेक्षक, पशुचिकित्सालय गव्हाळी (ता. अक्कलकुवा), श्री. प्रवीण निकम, कनिष्ठ लिपिक, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नंदुरबार तसेच श्री. लक्ष्मीकांत खैरनार यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यशाळेमुळे पशुधनाच्या आरोग्य व्यवस्थापनाबाबत अधिक सक्षम आणि प्रभावी पद्धतीने काम करण्यासाठी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळाले.

#animalhusbandrydepartment#LivestockHealth#VeterinaryServices#collectorofficenandurbar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here