बिजरी गावात जलसंधारणाच्या कामांतून जलसाठ्याचे पुनरुज्जीवन!

नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील बिजरी गावात तलावातील गाळ काढून जलसाठा पुनरुज्जीवित करण्याचे महत्त्वपूर्ण काम पूर्ण करण्यात आले आहे.
बिजरी गावात जलसंधारणाच्या कामांतून जलसाठ्याचे पुनरुज्जीवन!
bijri-water-conservation-lakes-revival
        पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तलावात साठलेले पाणी गावासाठी दिलासादायक ठरत आहे.
नाम फाउंडेशन, नदी की पाठशाला फाउंडेशन यांच्या सहकार्याने तसेच GDGS योजनेंतर्गत करण्यात आलेल्या गाळ काढण्याच्या कामात मुख्य तलावातून ९,५३६.७४ घनमीटर, तर तलावाच्या वरच्या बाजूला असलेल्या दहा कप्प्यांमधून ३,५०० घनमीटर, असा एकूण १३,०३६.७४ घनमीटर गाळ काढण्यात आला.
यासोबतच गावातील सात पाड्यांमध्ये एकूण १० सिमेंट नाला बंधाऱ्यांची (CNB) कामे करण्यात आली आहेत. तसेच झऱ्यांचे पुनरुज्जीवन व संरक्षण करण्यासाठी स्प्रिंग कॉर्डनिंगची कामेही हाती घेण्यात आली आहेत. या उपाययोजनांमुळे पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत पाणी मुरण्यास चालना देणे आणि स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन करणे या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

बिजरी गावातील पाडेनिहाय CNB कामे:

  •  जुनापाटीलपाडा – ३
  •  कुंडीपाडा – १
  •  पाल्हाबारीपाडा – १
  •  उसळ्या आंबापाडा – १
  •  देवमोगरापाडा – १
  •  वेळकळीपाडा – १
  •  करभारीपाडा – १
  •  दुत्ताळपाडा – १
वरील यादीत आठ पाड्यांची नावे असून एकूण CNB संख्या १० आहे.
बिजरी गावातील ही कामे जलसंधारण, उपलब्ध जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि विविध संस्थांच्या समन्वयातून जलसुरक्षेच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
मिशन जलबंधू — जलसुरक्षित गावांच्या निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्न
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: