सहा अभ्यासक्रम ऑफलाईन तर पाच अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने दिले जात असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब दिला जात असून सिमकार्डसाठी आवश्यक रक्कम डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा केली जाते. यामुळे ऑनलाईन शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये, हा उद्देश आहे. ऑनलाईन प्रशिक्षणामुळे उपस्थिती (अटेंडन्स) १०० टक्के नोंदवता येते.
















