Home नंदुरबार जिल्हा इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिलीचे प्रवेश सुरू

इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिलीचे प्रवेश सुरू

0
Admissions for class 1st in English medium residential ashram schools begin

(नंदुरबार) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या नंदुरबार, नवापूर आणि शहादा या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिलीचे प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती ठाणेपाडा शासकीय आश्रमशाळचे मुख्याध्यापक संतोष पैठणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

शासकीय इंग्रजी माध्यम प्राथमिक आश्रमशाळा, ठाणेपाडा, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार, व शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नवापूर, ता. नवापूर जि. नंदुरबार या शाळेत शासनाच्या धोरणानुसार आणि अटी-शर्तींच्या अधीन राहून प्रवेश दिले जाणार आहे.

तारखा आणि वेळ:

• अर्ज वाटप व स्वीकृती: 10 ते 25 एप्रिल 2026 पर्यंत.

• वेळ (सोमवार ते शुक्रवार): सकाळी 09.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत.

• वेळ (शनिवार): सकाळी 08.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत.

• टीप: सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज मिळतील.

इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी वर नमूद केलेल्या शाळांमध्ये जाऊन विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज प्राप्त करून घ्यावेत आणि वेळेत सादर करावेत, असेही आवाहन शासकीय आश्रमशाळचे मुख्याध्यापक संतोष पैठणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.