Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय येथे ऊर्जा विभाग आणि विविध...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय येथे ऊर्जा विभाग आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले.

1
An MoU was signed between the Energy Department and various companies at Mantralaya in the presence of Chief Minister Devendra Fadnavis.

स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ‘ऊर्जा संपन्न राष्ट्र’ बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना शासनाच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताला ऊर्जा संपन्न राष्ट्र बनवून देशात शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून या उद्दिष्ट पूर्तीसाठी महाराष्ट्र पुरेपूर प्रयत्न करीत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेल्या चार कंपन्यांमध्ये एनटीपीसीएल (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड), अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड व ललितपुर पावर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज उद्योग समूह) आदींचा समावेश आहे. याद्वारे राज्यात एकूण ६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून २५ हजार ४०० मेगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती आणि १ लाख २३ हजार ५०० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

यावेळी पारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, एनटीपीसी लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक ए. पी. सामल, अदानी पॉवर कंपनीचे बिझनेस हेड विवेक शर्मा, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या न्यूक्लिअर एनर्जी बिजनेसचे अध्यक्ष रंजय शरण आदी उपस्थित होते.

#MoU

#NewclearEnergy

#MahaDGIPR