
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही,असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
सदर वस्तुस्थिती लक्षात घेता, अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवण्यात येवू नये, असे आवाहन महिला व बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे















