Home महाराष्ट्र महाराष्ट्र विधानमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस...

महाराष्ट्र विधानमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस उपस्थित

0
Attended the meeting of the Legislative Assembly Business Advisory Committee, held in the run-up to the upcoming monsoon session of the Maharashtra Legislature.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. श्री. राहुलजी नार्वेकर,मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

विधानसभा कामकाज सल्लागार समिती ही अधिवेशनाचा कालावधी, कामकाजाचे नियोजन, लोकहिताचे विषय, शासकीय विधेयके, प्रश्नोत्तरे तसेच जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी चर्चा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी समिती आहे. २२ जून २०२६ ते १० जुलै २०२६ दरम्यान होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विविध विषयांवर सूचना मांडून चर्चेत सहभाग नोंदवला.लोकहिताशी निगडित प्रश्न, विकासकामे, शेतकरी, कामगार, युवक, महिला तसेच राज्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित मुद्द्यांवर अधिवेशनात प्रभावी चर्चा व्हावी यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी संसदीय कामकाज मंत्री श्री.चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष श्री.अण्णा बनसोडे,आ. श्री. नाना पटोले, माजी मंत्री आ.श्री. सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री आ.श्री. जयंत पाटील,माजी मंत्री आ.श्री. दीपक केसरकर, आमदार श्री. रणधीर सावरकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

#MaharashtraAssembly

#MonsoonSession2026

#VidhanBhavan

#PublicInterest