
पाण्याच्या साठवण टाक्यांचे लोकार्पण तसेच मुंढवा येथील महात्मा फुले चौक ते खराडी मेट्रो समवेत दुमजली उड्डाणपुलाचे ऑनलाईन भूमिपूजन यासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुणेप्रथम या लोगोचे अनावरण केले. पुणे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सुखसोयींसाठी ‘पुणे प्रथम’ ही संकल्पना मांडण्यात आली. पुणे शहरासंदर्भातील प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांचे कल्याण प्रथम मानले जाईल, हाच या विचारामागील मुख्य हेतू आहे. स्वतःसाठी नाही, तर रयतेच्या हितासाठी स्वराज्य उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या प्रेरणेतून या बोधचिन्हाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचा गौरव, डौलाने फडकणारी पताका आणि योग्य निर्णयांच्या काटेकोर अंमलबजावणीची मोहर सामावलेली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार योगेश टिळेकर, चेतन तुपे, भीमराव तापकीर, महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम आदी उपस्थित होते.















